पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट 34 गावांच्या प्रतिनिधींची आयुक्तांसोबत बैठक; नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा

पुणे  : पुणे महानगर पालिकेत 34 गाव विकास समितीची मासिक मिटिंग पार पडली,या मिटिंग मधे विविध भागातील नगरसेवकांनी प्रशासनाला विकास कामाबाबत होत असेलेल्या दिरंगाई बद्दल जाब विचारून धारेवर धरले.

नगरसेवक बाळासाहेब चांदेरे यांनी सुस महाळुंगे परिसरातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, वाहतुकीचे प्रश्न, सार्वजनिक विद्युत व्यवस्था, आदी प्रश्न पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यापुढे मांडले.


प्रभाग क्रमांक 22, मांजरी बु!!गाव, केशवनगर, शेवाळेवाडी या गावाच्या वतीने नगरसेवक बाळासाहेब घुले, नगरसेवक अजित घुले: नगरसेवक अमर घुले, नगरसेविका वंदनाताई कोद्रे,    नगरसेवक विक्की मने, नगरसेवक मयूर खलसे इत्यादीनीं मांजरी गावातील पाणी, रस्ते,लाईट, नळ वाटपात चाललेला अनियमित पणा, शाळा, दवाखाना, स्मशान भूमीत राखवालदार नेमणे, मयताचे अंत्यविधीचे पास गावात मिळावेत या संदर्भात जोरदार आवाज उठवला.

पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट 34 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत असो नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. समाविष्ट गावांमधील मुख्य रस्ते विकसित करण्यासाठी तसेच पाण्याची आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य दिले पाहिजे अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

समाविष्ट गावांमधील समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका स्तरावर प्रयत्न केले जातील असे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी यावेळी सांगितले.

See also  एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धेचे १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजन