मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर लवार्डे मुळशी येथे संपन्न

पुणे : गणेशखिंड येथिल माॅडर्न महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबीर या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवार्डे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे पार पडले.


या शिबिराचे उद्घाटन  प्रथम नागरिका मा. सौ. सुनंदाताई संभाजी चवले,उदयोजिका व  सरपंच लवार्डे , मा. श्री. योगेश दत्तात्रेय निंबाळकर (उपसरपंच, लवार्डे) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मा. डॉ. संजय खरात  (प्राचार्य मॉडर्न कॉलेज गणेशखिंड),डॉ. प्रकाश दीक्षित, (उपकार्यवाह, पी ई सोसायटी)यांच्या हस्ते झाले.
सरपंच मा सुनंदा चवले यांनी विद्यार्थ्यांना मातीतील उद्योजक व्हा व मातीशी नाळ जपा असे आवाहन केले.
शिबिरात डॉ. सतीश अंबिके(डिजिटल लिटरसी), डॉ. ज्योती गगनग्रास (उपप्राचार्य) व डॉ. शुभांगी जोशी (उपप्राचार्य) यांनी युवकांची व्यसनाधीनता युवा पिढी आणि उद्योजकता यावर तर प्रा. स्वाती कंधारकर (उपप्राचार्य) यांनी वेदिक मॅथेमॅटिक्सवर व्याख्यान दिले.


डॉ. शुभांगी भातांब्रेकर यांनी सायबर सेक्युररिटी यावर मार्गदर्शन केले. प्रा. विजयालक्ष्मी कुलकर्णी व फ्युचर बँकर्स फोरम टीम आणि जाणीव यांनी आर्थिक साक्षरता सर्वेक्षण केले.
मा. श्री मोहसीन शेख (दै. पुढारी),मा. केदार कदम (पुणे बुलेटिन),मा. महेश कचरे पाटील (मॅक न्यूज) यांनी युवकांचे सामाजिक भान यावर मार्गदर्शन केले.
वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता, प्लॅस्टिक कलेक्शन, सर्वेक्षण, आरोग्य शिबीर यासारखे कार्यक्रम शिबिरात घेतले गेले. रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले गेले.


मंदिर परिसर स्वच्छता, शाळेभोवतालची स्वच्छता, रस्ते तयार करणे, ग्रामसफाई, श्रमदान, प्रबोधनपर व्याख्याने, पथनाट्ये, मुल्यशिक्षण, गटचर्चा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक खेळ, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम अंधश्रध्दा निर्मूलन, शालेय मुलांसाठी कार्यक्रम व गावाचे सर्वेक्षण इ.कार्यक्रम घेतले गेले. नदीवर बंधारा बांधला आणि डाॅ अश्विनी महाजन व व्हाईट अँड ट्रस्ट फाॅर्म्यासुटीकल लि. यांनी नेत्रतपासणी शिबीर घेतले.
विद्यार्थ्यी अत्यंत आनंदाने व मोठ्या संख्येने त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी आपलंसं करून घेतलं व आयुष्यभराचे  ऋणानुबंध गावाशी तयार झाले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार .
या शिबिराचे काम प्रा कुमोद सपकाळ, कार्यक्रम अधिकारी, डाॅ मंजुषा कुलकर्णी सहकार्यक्रम अधिकारी, डाॅ गोविंद कांबळे, सहकार्यक्रम अधिकारी यांनी पाहिले. त्यांना श्री चारूदत्त काटे, श्री सतिश दोडके, श्री  ऋषिकेश शेडगे यांनी मदत केली. प्राचार्य डाॅ संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर पार पडले.

See also  सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरावस्तेकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याकरता "आप" चे आंदोलन