पुणे – महायुती सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रशासनात बदल सुरू केले आहेत. त्यानुसार १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (गुरुवारी) करण्यात आल्या.
या बदल्यांमध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांची बदली पदोन्नतीवर भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्त पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांची नियुक्ती झाली आहे. पुण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.