बाणेर बालेवाडी मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून 8 सोसायटीमध्ये इन्सिनरेटर मशीन बसवले

बाणेर : बाणेर बालेवाडी येथील सोसायट्यांमध्ये कॅबिनेट मंत्री आणि कोथरूड विधानसभा आमदार चंद्रकांत  पाटील यांच्या संकल्पनेतून उत्तर कोथरूड मंडळ च्या 8 सोसायटी मध्ये इंसिनरेटर मशीन बसविण्यात आले.

बायो हझारडस वेस्ट, जस की सेनिटरी नेपकिन, मोठ्या आणि छोटे डायपर अश्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोसायट्यांना त्रास होतो. हा कचरा जीरत नाही. ह्या मशीन मध्ये त्याची संपूर्ण राख होते अणि पर्यावरण पूरक पद्धतीनी विल्हेवाट लागते. 

या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन उत्तर कोथरूड च्या महिला मोर्चा अध्यक्षा अस्मिता करंदीकर यांनी केले.  महिला मोर्चा सचिव  प्राजक्ता देवस्थळी व मौसमी बकोरे यांनी व्यवस्थापन पाहिले. प्रकृती, पर्ल, आदित्य ब्रिज, ला विदा, साई कॅनरी सोसायटी मध्ये वापर सुरू करण्यात आला आहे.

See also  कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन