सुतारवाडी येथील श्री काळभैरवनाथ उत्सव उत्साहात साजरा

सुतारवाडी : सुतारवाडी पाषाण येथील सालाबादप्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री काळभैऱवनाथाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 

श्री काळभैरनाथाची पालखी झाली गावापासून १-२ कि.लो मीटर अंतरावर असलेल्या महादेव व मारुती मंदिरात पालखी सजविली व पालखीत काळभैरवनाथाचे मुखवटे ठेऊन आरती करून पुढे पालखी खांद्यावर घेऊन तसेच मानकरी पुढे व पालखी मागोमाग गावाच्या दिशेने आणली यादरम्यान ढोल-ताशा खेळ पथक,भजनी मंडळी व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आणि पालखीच्या बाजूने लुकलुकणारे दोन्ही बाजूला छत्र्याचे आवरण ताला सुरात पालखी गावात आल्यावर भैरवनाथाच्या मंदिरात आरती झाली.

महिलांनी आपापल्या घरासमोर मानकरी व पालखीचे पूजन केले या उत्सवात सर्व गाव सहभागी होऊन गुलालाची उधळण करून आनंददायी वातावरणात हा उत्सव अनुभवला.यावेळी समस्त सुतारवाडी गावातील लहान, मोठे तरूण,थोर, ज्येष्ठ लोकांनी व महिलांनी सहभाग घेतला.

See also  पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट गावातील विकास कामे व विविध प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले