पुणे दि. 9. पुणे शहराच्या विकासासाठी प्रलंबित योजना व प्रकल्प यांच्या बाबत केंद्र व राज्य सरकारच्या आगामी अंदाजपत्रकांमध्ये किमान २००० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सर्किट हाऊस येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
याशिष्टमंडळात दत्ता बहिरट, सुनील मलके, राजेंद्र सिरसाठ, रमेश अय्यर,प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे ,चेतन आगरवाल,सुरेश कांबळे, आशुतोष जाधव,सचिन बहिरट आदींचा समावेश होता.
विकास कामात राजकारण न आणता शहराचे विकासाचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
*पीएमपीएल ला लगेच 200 बसेस करण्याच्या सूचना सुद्धा महावस्थापक श्रीमती दिपाली मुंडे मुधोळ यांना दिली.*
*शिवाजीनगर एस.टी स्थानकाचे काम त्वरित सुरूच सुरू करण्याचा सूचना मेट्रोचे व्यवस्थापक श्री श्रावण हर्डीकर यांना देऊन राज्य परिवहन मंडळाकडे पाठपुरवठा करण्याचे सांगितले.*
घर ताज्या बातम्या पुणे शहराच्या प्रलंबित योजना व प्रकल्पांबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात...