कर्नाटकच्या सभेतून राहुल गांधींचा भाजप वर घणाघात.

“मोदी आणि आर एस एस म्हणजे भारत नाही. त्यांच्यावर केलेली टीका हि भारतावर केलेली टीका नाही” असे म्हणून राहुल गांधींनी त्यांच्या कर्नाटकच्या सभेमध्ये भाजपवर जोरदार प्रतिउत्तर दिले.
लंडनमधील राहुल गांधींच्या भाषणावरून भाजप आक्रमक दिसत होती. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची अवहेलना करत आहेत असा आरोप भाजप करत होती त्याला उत्तर देताना राहुल गांधींनी वरील वक्त्याव केले.
संसदेच्या अर्थकसंकल्पिय अधिवेशनाच्या काळातच या मुद्याने जोर पकडला होता.
कर्नाटक मधील निवडणूक जवळ असताना झालेल्या सभेत राहुल गांधींनी कर्नाटकातील भाजपच्या सरकारवरही भ्रष्टाचारचे आरोप केले. त्याच प्रमाणे राज्यातील जनतेला अनेक आश्वासनेहि आपल्या भाषणातून दिली.

See also  पिरंगुट येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन