ब्रिटेन मधील ७१ % भारतीयांकडे स्वतःची घरे. शैक्षणिक व नोकरीधंद्यातहि भारतीय इतरांच्या पुढे.

ब्रिटन मधील २०२१ साली झालेल्या जनगणनेच्या माहितीवरून काही विशेष गोष्टी समोर आल्या आहेत.
२०२१ च्या जनगणनेतून बाहेर आलेली माहिती ब्रिटन मध्ये राहणाऱ्या भारतीय मूळ असलेल्या लोकांची परिस्थिती हि त्यांच्या यशस्वितेची ग्वाही देणारी आहे.
या आकड्यांनुसार येथील भारतीय मूळ असलेल्या लोकांची स्वतःची घरे, शैक्षणिक अवस्था, व नोकरी धंद्यातील परिस्थिती विशेष समाधानकारक आहे.
येथील ७१ % भारतीयांकडे स्वतःची घरे आहेत तर स्थानिक ब्रिटिश नागरिकांपैकी केवळ ६८ % लोकांना स्वतःची घरे आहेत.

See also  समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशन व विविध कार्यक्रमांचे आयोजन