पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना सुरुवातीला ते ३३ आणि ५० टक्के आरक्षण दिले. सुरुवातीला महिला राजकारणात येतील का नाही. असे वाटत होते. पण आता महिला राजकारणात येऊन त्यांनी चांगले काम करून दाखवले आहे. त्यामुळे या पुरस्कारांमध्ये आता महिलांचा देखील समावेश केला पाहिजे. अशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी आयोजकांकडे व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांना तर सांप्रदायीक भूषण पुरस्कार युवा किर्तनकार संतोष महाराज पायगुडे यांना पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला. डेक्कन येथील हॉटेल सुभद्रा कट्टा यांच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी व्यासपीठावर पुरस्कार विजेते आणि रामभाऊ बराटे यांचा मुलगा सचिन बराटे उपस्थित होते.
रामभाऊ बराटे यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण होती. त्यांच्या कामाचा ठसा ग्रामीण भागात उमटवला आहे. त्यांच्या प्रेरणेतून उत्तम काम आणि ग्रामीण विकास व समाज हिताचे कार्य करण्याचा उद्देश असला पाहिजे.
पालकमंत्री पवार म्हणाले, सोपान वाळुंज दिलीप बाटिया, असे ग्रामीण भागातले नव नेतृत्व काळाच्या ओघात पडद्याआड गेले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मनाला हुरहुर लागली आहे.
हा कार्यक्रम नवीन सर्किट हाऊस मधील छोटेखानी हॉलमध्ये पार पडला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, मारुती किंडरे, संजय जावळकर, संजय वाल्हेकर आणि मित्र परिवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मराठी यांचे सहकारी रमेश खांदवे मुरलीधर निंबाळकर, शेखर कुठे बापू घाटगे विजय कदम सतीश मोहोळ संदीप निंबाळकर नंदू पवार यांची तसेच बराटे यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी दिलीप बराटे, शुक्राचार्य वांजळे, विकास दांगट, सतीश बोडके, बाबा धुमाळ, सायली वांजळे, राजेंद्र खांदवे, संजय उभे, लहू निंवगणे, आबा जगताप, श्रीकांत जगताप, श्रीकृष्ण बराटे उपस्थित होते. प्रास्ताविक जालिंदर कामठे यांनी केले. तर सुत्रसंचलन व आभार मारुती किंडरे यांनी मानले.