बाणेर येथील अनेक वर्ष रखडलेल्या ननवरे चौक ते पॅन कार्ड जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला “मिसिंग लिंक” प्रकल्पा अंतर्गत सुरुवात

बाणेर ‌: पुणे महानगरपालिकेमध्ये चुकीच्या बांधकाम परवानगी मुळे गेले अनेक वर्ष रखडलेला ननवरे चौक ते पॅन कार्ड कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम कॅबिनेट मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्न मुळे सुरू झाले आहे. पुणे महानगरपालिकेतील मिसिंग लिंक प्रकल्प अंतर्गत या कामाला गती मिळाली असून हे काम लवकरच पूर्ण होणार. काही वर्षांपूर्वी स्थानिक राजकीय दबावामुळे पुणे महानगरपालिकेने बांधकामांना परवानगी देताना चुका केल्या होत्या यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्याला जागा न देण्याचा निर्णय घेतला होता. घोटाळेबाज अधिकारी व राजकीय नेते यांच्यामुळे सुमारे बारा वर्ष हा रस्ता रखडला होता.

बाणेर मधील वाहतूक कोंडीला पर्याय ठरणारा महत्त्वाचा ननवरे ब्रिज येथील रस्त्याच्या कामाची पाहणी भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रकाश बालवडकर तसेच कोथरूड विधानसभा अध्यक्ष लहू बालवडकर यांनी केली. यावेळी भाजपाचे गणेश कळमकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर तसेच भाजपाच्या पदाधिकारी उपस्थित होते.

कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून बाणेर बालेवाडी परिसरातील मिसिंग लिंक प्रकल्प अंतर्गत विकास आराखड्यातील अपूर्ण रस्ते पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसोबत जागा मालक मुरकुटे व बांधकाम व्यावसायिक बाफना यांच्या सोबत बैठकांचे आयोजन करण्यात आले होते तसेच सुमारे दीडशे कोटीहून अधिक रुपये या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत.

बाणेर येथील ननवरे ब्रिज येथील 24 मीटर डीपी रस्ता पूर्ण झाल्यानंतर बिटवाईज चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच बाणेर मधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा वापर करता येणार असून महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास देखील याचा उपयोग होणार आहे.

See also  श्रीलंकेला अंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून ३ अब्ज डॉलर अर्थसहाय्य.