निलंबित आर्मी कर्नलवर सहकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; अद्याप अटक नाही

पुणे:येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८००/२०२४ अंतर्गत निलंबित लेफ्टनंट कर्नल धनाजीराव शिवाजीराव पाटील यांच्यावर भा.द.वि. कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार लेफ्टनंट कर्नल रजनीश प्रताप यांच्या फिर्यादीनुसार दाखल केली आहे.

या प्रकरणात कर्नल रजनीश प्रताप यांना करकगाव, आंबोळगड, आणि येरवडा येथे जमीन देण्याचे आश्वासन आले होते .पंरतु वेळोवेळी फसवणूक दाराने २०१२ ते २०२० दरम्यान एकूण ३७ लाख रुपये उकळण्यात आले.

याशिवाय इतर गुंतवणूकदारांना सभासद बनवून उघडलेल्या बचत गटाच्या खात्यातून रक्कम गोळा करण्यात आली आहे. पंरतू त्यांना जमीन देण्यात आलीनाही आणि रक्कम ही परत आलेली नाही . आरोपीने गुंतवणूकदारांच्या पैशांतून स्वतःच्या नावावर जागा खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

तक्रारीनुसार, धनाजीराव पाटील यांनी आर्मीमध्ये कार्यरत असताना व्यवसाय केला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीदरम्यान हे सिद्ध झाले आहे. या फसवणुकीत इतर अधिकारी व जवानांनाही आरोपीने गंडा घातल्याचे स्पष्ट तपासात निष्पन्न झाले आहे.

फसवणुकीची रक्कम ही कर्नल हरीश जोशी ५१लाख कर्नल बेनेलकर: ५० लाख तर शिपाई हितेश मुंग्रा ४१ लाख इतकी आहे. यामुळे धनाजीराव पाटील यांना आर्मीने निलंबित केले आहे.पोलिस तक्रार व तपास:आर्मीच्या चौकशीनंतर कर्नल रजनीश प्रताप यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तपास अधिकारी गौरी झोरे यांनी तपास करून भा.द.वि. कलम ४२० बरोबरच एमपीआयडी कायद्यांतर्गत कलमे देखील जोडली आहे.

एमपीआयडी कलमे वाढवण्यापूर्वी आरोपीने पुणे जिल्हा न्यायालयात २०१८ चे खरेदी खत दाखवून अंतरिम जामीन मिळवला. मात्र, एमपीआयडी कलमे जोडल्यावर प्रकरण विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले.या प्रकरणामुळे ले. कर्नल डी.एस. पाटील यांच्यावर “वर्दीतील अपराधी” अशी छाप पडली आहे.

सांगली, मिरज आणि इतर ठिकाणी “डिफेन्स कॉलनी”च्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या चर्चाही सध्या रंगल्या आहेत.या प्रकरणावर संपूर्ण आर्मी विभाग व इतर नागरिकांना न्याय कधी मिळणार असा सवाल विचारला जात आहे.

See also  मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित