बाणेर : बाणेर पोलीस स्टेशन अंतर्गत बाणेर पोलीस वाहतूक शाखेच्या नूतन कार्यालयास जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रिंटर त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची फ्रेम सप्रेम भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शफिर पठाण उपस्थित होते.जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे पोलीस खाते आणि जनता यांच्यातील दरी कमी होऊन सुसंवाद वाढावा, यासाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन अग्रेसर राहून काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार बाणेर बालेवाडी कार्याध्यक्ष पंकज खताने, सतीश कांबळे यांनी वाहतूक शाखेला प्रिंटर सुपूर्द केला.