औंध मोहल्ला कमिटीच्या बैठकीत रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न प्रामुख्याने नागरिकांनी उपस्थित करत दुरुस्तीची मागणी केली

औंध : औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये मोहल्ला कमिटी बैठक घेण्यात आली. यामध्ये नवीन नियुक्त झालेले सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांचे मोहल्ला कमिटी सदस्यांकडून स्वागत करण्यात आले.

दरम्यान मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये औंध, बाणेर,पाषाण , सुस परिसरात पडलेले रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मांडली. तसेच रस्त्यावर साठत असलेले पावसाचे पाणी यावर उपाययोजना करण्याची मागणी ही नागरिकांनी केली. सुस रोड परिसरातील सिग्नल सुरू करण्यात यावे, स्मार्ट सिटी ने केलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .

सुसगाव परिसरातील गावठाणा जवळील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे व मुख्य रस्त्यावरील अनधिकृत दुकानांवर हॉटेलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुस गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली. सुसगाव परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात तसेच मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये वाहतूक विभाग अधिकाऱ्यांना बोलवण्यात यावे. औंध बाणेर पाषाण बालेवाडी परिसरातील लटकलेल्या केबल तसेच रस्त्यावरती पडलेल्या केबल ताबडतोब हटवण्यात याव्यात. आठवडी बाजाराचा पडणारा कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात यावी, बालेवाडी हाय स्ट्रीट, औंध आयटीआय परिसर, वसाहती मधील स्वच्छतागृहाचे प्रश्न महिलांनी बैठकीमध्ये उपस्थित केले.

या समस्या बाबत बोलताना सहाय्यक आयुक्त गिरीश दपकेकर म्हणाले की, मुख्य रस्ते हे पालिकेच्या मुख्य विभागाकडे येत असून खड्ड्याची समस्या पालिकेच्या मुख्य खात्याला कळविण्यात येईल व इतर समस्या पाहाणी करून लवकरात लवकर सोडवण्यात येतील.

See also  महाराष्ट्र मेडिकल स्टोअरचा शुभारंभ मोठ्या पवित्र कार्याची सुरुवात आहे - भानुप्रताप बर्गे