राज्यसभेमध्ये बजेट वरील भाषणात खासदार मेधा कुलकर्णी यांनी मोदी सरकारचे कौतुक करत विरोधकांना सुनावले

नवी दिल्ली: राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजेटवर वीस मिनिट भाषण करत महत्वपूर्ण मुद्दे मांडले.
भाषणाच्या सुरुवातीला दिल्लीमधील विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्ता व जनतेचा विश्वास मिळवला आहे यामुळे दिल्लीमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला आहे.

यावेळी राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका करणाऱ्यांचा समाचार यावेळी मेधा कुलकर्णी यांनी घेतला. हे बजेट राष्ट्रभक्तीवर आधारित राष्ट्राला समर्पित आहे. यांचे एजंडे वेगळे आहेत त्यांना हे बजेट निराशा जनक वाटेल. राष्ट्रपतींचे भाषण बोर आहे असे म्हणणाऱ्यांना दिल्लीतील जनतेने त्यांची जागा दाखवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले बजेट हे सर्व समावेशक आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राला यावर्षी देखील बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रो साठी ८३७, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट साठी मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी 230 कोटी, नागा नदी सुधार प्रकल्प, मुंबई आमदाबाद हाय स्पीड ट्रेन साठी चार हजार कोटी, मुंबई मेट्रो साठी 1600 कोटी, ग्रामीण सुधार साठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

पुण्यामध्ये मेट्रो, नदी सुधार, रस्ते, आळंदी ते पंढरपूरवारी मार्ग, रिंग रोड एसटीपी प्लांट साठी मोठ्या प्रमाणात निधी मोदी सरकारकडून मिळाला आहे.
मोदीजींचे सरकार देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. मोबाईल बनवण्यामध्ये भारत एक नंबर देश आहे, विदेशात ट्रान्सपोर्ट वाढला आहे. स्टीलच्या निर्मितीमध्ये देश प्रथम आहे. दररोज दोन कॉलेजेसची निर्मिती होत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये मोदी सरकारकडून भरीव तरतूद खाण्यात आले आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळी बजेट वर बोलताना विविध विषयावरील तरतुदींचा उल्लेख करत विरोधकांना देखील सुनावले.

See also  इंद्रायणीकाठी गीताभक्ति अमृत महोत्सवासाठी संतांची मांदियाळी!