बालेवाडी येथील श्री खंडेराय  प्रतिष्ठानचे ज्ञानसागर इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचा चिपको आंदोलनामध्ये सहभाग

बालेवाडी : बालेवाडी येथील श्री खंडेराय  प्रतिष्ठानचे ज्ञानसागर इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट अँड   रिसर्च च्या विद्यार्थ्यांनी बाणेर बालेवाडीतील वाहणाऱ्या मुळा राम नदी संगम पात्रात सुरू असलेल्या नदी सुधार योजनेअंतर्गत कामांना विरोध करण्यासाठी चिपको मार्च आंदोलनांतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला होता .यामध्ये डीआयएमआर च्या विद्यार्थ्यांनी ही हजारो लोकांच्या समवेत हिरीरीने  भाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण ,नदी, पाणी ,झाडे वाचवा संदर्भात विविध घोषणा देऊन पर्यावरण रक्षणाचे फलक दाखवून नागरिकांना  जागृत केले.


पर्यावरणाचे रक्षण ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे .पाणी म्हणजे जीवन. पाणी म्हणजे नदी आणि श्वास म्हणजे झाडे याशिवाय जीवनात काहीही महत्त्वाचे नाही . असे प्रतिपादन लेह लडाख येथील पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते सोनम  वांगचुक यांनी केले. तसेच जमलेल्या पर्यावरण प्रेमीनागरिकांना संबोधित करताना ज्येष्ठ अभिनेते सह्याद्री देवराईचे पुरस्कर्ते सयाजी शिंदे यांनी नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले व सुंदर गीत पर्यावरण रक्षणाचे एक सुंदर गीत सादर. यावेळी शालेय मुलांनीही आपले पर्यावरण विषयी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकले.


सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी डीआएमआर चे संचालक डॉ. साजिद अल्वी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.तसेच या उपक्रमाचे समन्वयक एमबीए च्या  विभाग प्रमुख  डॉ. मनीषा  जगताप यांच्या सहकार्याने ग्रंथपाल श्री सुंदर पाचकुडवे  व सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर श्री अचिंता मंडल यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने  पर्यावरण वाचवा मोहिमेत सहभाग घेतला.
या पर्यावरण मोहिमेत सहभागी झाल्या बद्दल श्री खंडेराय  प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर आंदोलनात सहभागी झाले होते.

See also  मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील