जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

पुणे : भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात त्यांना आदरांजली अर्पण करून राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली. यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ दिली.

कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, माहिती अधिकारी सचिन गाढवे, उपसंपादक रोहिदास गावडे यांच्यासह विलास कसबे, ज्ञानेश्वर कोकणे, अमित खडतरे, सुजित भिसे, विलास कुंजीर, सुनील झुंजार, पांडुरंग राक्षे, रावजी बांबळे, मीरा गुथालिया आदी विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

See also  पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश