अंदमानच्या कृषी संशोधन केंद्रास महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञांची भेट

बाणेर पुणे :- भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मध्यवर्ती बेट कृषी संशोधन केंद्र, गरचरमा पोर्ट ब्लेअर– अंदमान येथील संशोधन केंद्रास बाणेर येथील ४७ जेष्ठ शास्त्रज्ञांनी भेट दिली. असे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर जनार्दन कदम सांगितले.  डॉ.कदम हे माजी सहयोगी संशोधन संचालक सोलापूर येथे होते.

या ग्रुपमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ज्येष्ठ पंधरा कृषी शास्त्रज्ञांचा समावेश होता. अंदमान येथील कृषी संशोधन केंद्र तील औषधी वनस्पती वर संशोधन चालू आहे. त्यामध्ये लवंग, दालसचनी, जायफळ, सुपारी व सवसवध नारळाच्या जाती. याविषयी माहिती घेण्यात आली. पोर्ट ब्लेअर येथील डॉक्टर चाकूरकर, भारतीय मध्यवर्ती कृषी संशोधन केंद्र चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अजित वामन यांनी संशोधनाची सविस्तर माहिती दिली.

या मध्ये  माशांचे संशोधन – नवीन जाती, वराहपालन संगोपन, नारळाच्या नवीन जाती व मसाल्याचे पदार्थयावर संशोधन चालू आहे, अशा हवामानात शेतीची पीक पद्धत, एकासत्मक पीक पद्धती, अंदमान नारळाचे पीकातील अंतर पीके, पाणी व्यवस्थापन, पशु विज्ञान अंदमान शेळी व मेंढी, उद्यानविद्या, नैसर्गिक साधन संपत्ती, आंबे, अंदमान भाताच्या नवीन जाती आधी विषयावरील माहिती घेतली.

अंदमान येथील शेतीचे प्रयोग महाराष्ट्र राज्यात उपयोगी होतील. असे वाटते प्राध्यापक डॉक्टर जनार्दन कदम यांनी सांगितले.

See also  भोर मधील माजी आमदार शंकर भेलके, यांचे नातू अनिल भेलके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश