ह.भ.प ज्योतीभाऊ विश्वनाथ थोरवे यांचे निधन

बालेवाडी : ह.भ.प ज्योतीभाऊ विश्वनाथ थोरवे रा. बालेवाडी यांचे ०९/०४/२०२४ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी जीवन जगत असताना सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात काम केले आहे त्यांना अनेक सांप्रदायिक व अध्यायत्मिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.

त्यांच्या पाठीमागे दोन मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार आहे. ॲड. पांडुरंग ज्योतीभाऊ थोरवे विश्वस्त- श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी,  मा. अध्यक्ष पुणे बार असोसिएशन व श्री. ज्ञानेश्वर ज्योतीभाऊ थोरवे अध्यक्ष- लायन्स क्लब ऑफ पुणे फोर्ट  यांचे वडील आहेत. दशक्रिया विधी दिनांक १८/०४/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांचे प्रवचन होणार आहे.

See also  आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार