मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे 28 फेब्रुवारी अखेर उद्दिष्ट पूर्ण करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ; प्रत्येक बँक शाखेला अवघ्या तीन कर्जाचे उद्दिष्ट

पुणे : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम शासनाची महत्वाकांक्षी योजना असून 2024-25 या वर्षात देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, याकरीता प्रत्येक बँक शाखेने किमान 3 कर्ज प्रकरणाची उद्दिष्ट 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी योगेश पाटील, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, विविध बँकेचे क्षेत्रीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. सन 2024-25 या वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया व पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेअंतर्गत अद्यापही कर्ज प्रकरण मंजूर न झालेल्या शाखा प्रमुखांनी वेळेत कर्ज प्रकरणे मंजूर करावी. सर्व संबंधित शाखा प्रमुखांनी योजनेच्या उद्दिष्टपुर्तीच्या अनुषंगाने प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले.
यावेळी श्री. पाटील यांनी बँक शाखाधिकारी यांना कर्ज प्रकरणे मंजूरीबाबत कार्यपध्दतीबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेले उद्दिष्टपूर्तीकरीता बँकांने सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती कोठारी यांनी केले.

See also  सार्वजनिक वाहतूक सक्षम व सुरक्षित करण्याला प्राधान्य - जितेंद्र पाटील यांचे प्रतिपादन; 'बस अँड कार ऑपरेटर्स'च्या वतीने बस चालक-मालकांचा वार्षिक स्नेहमेळावा