कोंढाणा विजयाच्या स्मृती अमृतेश्वराचे यात्रेतुन पुन्हा: जागवल्या.

खडकवासला : ज्या ठिकाणी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा – आजचा सिंहगड जिंकण्याची रणनिती आखली‌ होती त्याच किल्ले सिंहगडाचे ऐतिहासिक कोळीवाड्यावर श्री. अमृतेश्वराचे पारंपरिक यात्रेचे निमित्ताने सालाबादप्रमाणे जागरण गोंधळाचे माध्यमातून भक्ती – शक्तीचा जागर झाला.

तानाजी मालुसरेंच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून या वर्षी सिंहगड घेऱ्यात विविध कार्यक्रम राबविले गेले होते .‌( शुक्रवारी ) अष्टमीला कोळीवाडा येथील अमृतेश्वराचे यात्रेतुन पारंपरिक जागरण गोंधळात बेल भंडाऱ्याची उधळण करत नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि आदिवासी कोळी महादेव समाजाचे प्रमुख गडाचे गडकरी खंडोजी नाईक कोळी – घेरे सरनाईक यांच्या स्वराज्य निष्ठेच्या स्मृती जागृत करण्यात आल्या‌ . घेरा सिंहगड परिसरातील ऐतिहासिक कोळी वाड्यावर पारंपरिक अमृतेश्वराची यात्रा व जागरण गोंधळाचे माध्यमातून भक्ती शक्तीचा जागर रात्रभर सुरू होता. पंचक्रोशीतील नागरिकांनी व शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते आवर्जून या यात्रेला आले होते.पारंपारिक जागरण गोंधळात ‘बेल भंडारा’ उधळून नरवीरांच्या शौर्याचा महिमा सादर केला गेला .कोंढाणा किल्ला जिंकून देण्यासाठी गडाचे गडकरी आदिवासी कोळी महादेव समाजाचे सेनानायक  खंडोजी नाईक कोळी-घेरे सरनाईक यांनी सुभेदार तानाजी मालुसरेंना स्वराज्य निष्ठेचे शपथ घेऊन दिलेली साथ आणि गड चढण्यासाठी मार्ग दाखवुन दिलेलं योगदान शाहीरांकडुन  पोवाड्यातुन मांडले जात असताना लोक  अक्षरशः रोमांचित होत होते.


नरवीरांची स्वराज्याचे प्रती असणारी निष्ठा आणि भावनेला यातुन उजाळा मिळाला. तानाजी मालुसरे यांनी अमृतेश्वराचे यात्रेचा आधार घेऊन गडाचे गडकरी खंडोजी नाईक कोळी- घेरे सरनाईक आणि स्थानिक आदिवासी महादेव कोळी समुदायाशी संबंधीत स्थानिक सैन्य हाताशी घेण्यासाठी सिंहगड घेऱ्यातील याच कोळी वाड्यावरील घेरे नाईकांचे अमृतेश्वर मेटावर गोंधळ्याच्या वेशात येऊन जागरण गोंधळ केला होता. तो मुहूर्त आणि ती परंपरा आजही येथे जपली जाते. माघ वद्य अष्टमील ही यात्रा भरते. विशेष म्हणजे मध्यरात्री बारा वाजता अमृतेश्वराचे साक्षिने जागरण गोंधळात ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे’ असा जयघोष करीत बेल- भंडारा उधळुन  अष्टमीच्या रात्री द्रोणागीरी कड्याने गडावर येण्याची परंपरा स्थानिक गावकरी व शिवप्रेमी आजही जपतात.  

See also  बारामती मतदारसंघातील मतदार याद्या गुजरातमध्ये तयार झाल्या? गुजराती लिपीमध्ये मध्ये मतदारांची नावे सापडली

  
आमदार भिमराव तापकीर यांनी या वर्षी मंडप व्यवस्था व जनरेटरची व्यवस्था केली होती. शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, उद्योजक उदय शिंदे, स़दिप मते- पाटील, वनपाल समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर, इतिहास अभ्यासक अशोक सरपाटील यांनी या   कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले .  कार्यक्रमाला  आर्किटेक्ट भाग्यश्री चौधरी, शिवव्याख्याते ओंकार यादव, मयुर तातुसकर, वनपाल समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर,साई जोशी, मनोहर टेमगीरे, शिवालिका संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोडीतकर , खामगावच्या हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण गोळे, पत्रकार संदीप वाडेकर,हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले, चंदु सांबरे , नितीन गोळे, आदी उपस्थित होते.


नरवीरांच्या शौर्याच्या शक्तीचा हा जागर कार्यक्रम करण्यासाठी माजी सरपंच दत्तात्रय जोरकर, भानुदास जोरकर , हरिभाऊ,‌ जोरकर , राहुल जोरकर ,गडकिल्ले संवर्धन संस्थेचे शांताराम लांघी,गणेश वारुंडे, श्रीकांत लांघी, दत्ता बंडु जोरकर , राहुल जोरकर ,सागर जोरकर,विकास जोरकर, पोपट जोरकर, संदीप जोरकर , दिपक जोरकर , शंकर डोंगरे, अनिल जोरकर,चंदू जोरकर,आबा वारुंडे, विजय जोरकर, चंद्रशेखर जोरकर,
यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक दुर्गदरा गाव, पंचमुखी मारुती मित्र मंडळ , सिंहगड पावित्र्य मोहिम, खंडोजी नाईक कोळी – जोरकर ( घेरे सरनाईक ), यांचे वंशज तसेच समस्त
खामकर, लांघी, वारुंडे   परिवार कार्यक्रमाचे आयोजन सहभागी होता.