पुणे : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात ठाकरे सेनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुण्यात गोऱ्हे यांच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. निलम गोऱ्हेंनी आत्तापर्यंत पदासाठी किती गाड्या दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी द्याव्या, अशी मागणी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये बोलताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंबाबत दावा करत राज्यात नव्या वादाला तोंड फोडलं आहे. याप्रकरणी, नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्या महिला कार्यकर्त्यांनी अनेक मोठं आरोप केले आहेत.
पुण्यात मॉडेल कॉलनी येथील नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. यावेळी महिलांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. महिलांनी हातात टायर आणि मर्सिडीज गाड्याचे पोस्टर आणले होते त्यावरती टायरवाल्या काकू असा उल्लेख गोऱ्हे यांचा करण्यात आला आहे.
उध्दव ठाकरेंचा अपमान केला आहे, त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. गोऱ्हेंनी आत्तापर्यंत पदासाठी किती गाड्या दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी द्याव्या, असं यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. खेळण्यातील मर्सिडीज गाड्या दाखवत नीलम गोऱ्हे तुम्ही आता यातून गोल गोल फिरा म्हणत हल्लाबोल केला.
वाढदिवसाच्या वेळी नीलम गोऱ्हे आम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना माडंव घालायला सांगतात, एलईडीच्या माळा लावालया लावतात. प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी करतात, त्या नीलमताई आता यावर बोलतील का? अस सवाल ठाकरे गटाच्या आक्रमक महिलांनी उपस्थित केला. त्या जोड्यांनी मारण्याच्या लायकीच्या आहेत असं म्हणत महिलांनी त्यांच्या फोटोला पायदळी तुडवलं. याप्रकरणी काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी आणि त्यांनी आत्तापर्यंत मिळालेल्या पदासाठीच्या पावत्या पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात असं महिलांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्या ज्या गाडीमधून फिरत आहेत त्या देखील पक्षातील गटनेत्यांनी दिली आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी खाणं, पिणं, मंडप आणि सर्व खर्च त्या आमच्याकडून घेत असा आरोपही ठाकरे गटाच्या महिलांनी यावेळी केला आहे. गोऱ्हे भेटीसाठी महिलांकडून गिफ्ट घ्यायच्या. त्या आम्हाला वेळ देण्यासाठी आमच्याकडून साडी घ्यायच्या, त्यांनी आमच्याकडून दहा ते पंधरा हजारांची साडी देखील घेतली असा आरोप देखील महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
घर ताज्या बातम्या निलम गोऱ्हेंनी आत्तापर्यंत पदासाठी किती गाड्या दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी द्याव्या ठाकरेंच्या...