खडकीमध्ये १कोटी६०लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

पुणे –  आमदार विशेष निधीतून छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील खडकी येथे १ कोटी ६० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

या कामांमध्ये रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, ड्रेनेज लाईन टाकणे, मैदाने विकसित करणे, नाला बंदिस्त करणे, व्यायाम शाळेसाठी साहित्य पुरविणे, रस्त्यांचे डांबरीकरण, सामाजिक सभागृह बांधणे, अभ्यासिका बांधणे. अशा कामांचा समावेश असून, खडकीत १६ ठिकाणी अशा कामांना सुरुवात झाली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या भूमिपूजन कार्यक्रमांच्यावेळी आनंद छाजेड, दुर्योधन भापकर, संगिताभाभी गवळी, धर्मेश शहा, कार्तिकीताई हिवरकर, नेहाताई गोरे, अजित पवार, राहुल कांबळे, मनिषाताई कांबळे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

See also  मोदी - शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला : डॉ. कुमार सप्तर्षी ,मोदी लाट ओसरल्याने लोकसभा त्रिशंकु येईल