राष्ट्रीयत्वाच्या विचारांचे संस्कार देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेतुन होतात- मा.खा.मेधाताई कुलकर्णी

पुणे : “सुराज्य टिकवणारी ही गाणी आहे. दुष्ट प्रवृत्तीशी लढण्याची ताकत ही गाणी देतात. कलाकाराला सामाजिक भान असणारे कलाकारांना जाणिव तयार होते.  राष्ट्रीयत्वाच्या विचारांचे संस्कार या स्पर्धेतुन होतात.”असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी तर्फे पूजनीय कै शशिकला रमाकांत एकबोटे (आक्कासाहेब) आंतरशालेय महाविद्यालयीन देशभक्तीपर समुहगीत स्पर्धा घेण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.


पी ई सोसायटीचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन एकबोटे म्हणाले” आपल्याला राष्ट्रभक्त नागरीक तयार करायचे आहे. या संस्थेत प्रथम पासूनच असे संस्कार केले जातात.मोठ्या स्पर्धेला तोंड देताना आई वडील गुरु यांना विसरू नका.आवडते क्षेत्र निवडा. सदैव सकारात्मक रहा. स्वत:वर विश्वास ठेवा.”


या स्पर्धेमधे ६ गट व ३३ संघ सहभागी झाले.
जयोस्तुते जयोस्तुते व ए मेरे वतन के लोगो ही समुहगीते या प्रसंगी सादर करण्यात आली. सौ स्वाती पटवर्धन, सौ प्रियांका भट,सौ रेणु भालेराव, श्री अशोक कांबळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचे निकाल पुढिलप्रमाणे

पूर्व प्राथमिक गट
१. प्रथम क्रमांक : माॅडर्न पूर्व प्राथमिक ईंग्रजी माध्यम निगडी
२. द्वितीय क्रमांक : माॅडर्न शिशु विद्यामंदिर,(मराठी),
३. माॅडर्न शिशु विद्यामंदिर, गणेशखिंड पुणे १६
उत्तेजनार्थ : माॅडर्न प्री प्रायमरी स्कूल NCL
प्राथमिक गट :
१. प्रथम क्रमांक : माॅडर्न प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे ५
२. द्वितीय क्रमांक : प्राथमिक विद्यामंदिर शिवाजीनगर
३. तृतीय क्रमांक : प्राथमिक विद्यामंदिर, यमुना नगर, निगडी
उत्तेजनार्थ : प्राथमिक विद्यामंदिर, गणेशखिंड पुणे १६

उच्च प्राथमिक गट
१. प्रथम क्रमांक :  प्रथम क्रमांक : माॅडर्न ईंग्रजी माध्यम हायस्कूल,
2. द्वितीय क्रमांक : माॅडर्न हायस्कूल, ईंग्रजी माध्यम, NCL
३. तृतीय क्रमांक : पी ई एस माॅडर्न गर्ल्स हायस्कूल, पुणे ५
उत्तेजनार्थ : माॅडर्न हायस्कूल मुलांचे शिवाजीनगर , पुणे ५


माध्यमिक गट
१. प्रथम क्रमांक : माॅडर्न हायस्कूल, ईंग्रजी माध्यम, NCL
2. द्वितीय क्रमांक : पी ई एस माॅडर्न गर्ल्स हायस्कूल, पुणे ५
३. तृतीय क्रमांक : माॅडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (मराठी  माध्यम) निगडीत
उत्तेजनार्थ : माॅडर्न हायस्कूल,भोसे, ता खेड, जि पुणे

कनिष्ठ महाविद्यालय गट
प्रथम क्रमांक – माॅडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कनिष्ठ, शिवाजीनगर पुणे ५
वरिष्ठ महाविद्यालय गट
प्रथम क्रमांक : माॅडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,वरिष्ठ शिवाजीनगर पुणे ५
द्वितीय क्रमांक : माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे १६
तृतीय क्रमांक : पी ई एस माॅडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे ५

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सतिश लिंबेकर, गणेश वंदना सौ क्षिप्रा पंढरपुरे, यादी वाचन सौ माधवी चिटणीस यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ पुष्पा रामटेके यांनी केले.प्रास्तविक मुख्याध्यापिका सौ माया नाईक यांनी केले. समस्त हिंदु आघाडीचे आध्यक्ष श्री मिलिंद एकबोटे, पी ई सोसायटीचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख, उपकार्यवाह डाॅ जोत्स्ना एकबोटे, विविध महाविद्यालयाचे मुख्याध्यापक,प्रमुख, नियामक मंडळाचे सर्व सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले - अभिनेत्री छाया कदम