पिंपरी : पिंपळे निलख प्रभागाची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे पण वाढती लोकसंख्या या गोष्टी मुळे जागोजागी कचऱ्याची समस्या डोक वर काढत होती आणि याचाच परिणाम म्हणून अनेक सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहू लागले आणि प्रभागाच्या सौंदर्याला कळा लागली पण यावर आप चे रविराज काळे आणि मार्ग काढत एक शकल लढवली ज्या ज्या ठिकाणी असा कचरा जमा होतोय अशा ठिकाणी सेल्फी पॉईंट उभे करायच, ती जागा सुशोभित करायची.
पण कल्पना चांगली असून सुधा ती प्रत्यक्षात उतरण एवढ सोप नव्हतं शहरात काही ठिकाणी पालिका प्रशासाने हा उपक्रम राबविला होता पण प्रभागात हे शिवधनुष पेलन सोपी गोष्ट नव्हती पण यावेळी रविराज काळे यांना साथ लाभली ती खंडेराव बलकवडे ( मुख्य आरोग्य निरीक्षक pcmc), शंकर घाटे ( उप आरोग्य निरीक्षक pcmc), योगेश फल्ले ( मुख्य आरोग्य निरीक्षक pcmc) आणि प्रभागात क्रांती चौक मध्ये या क्रांती कारी निर्णयाची मुर्तमेढ रोवण्यात आली आणि पुढे ही ही कल्पना प्रभागात अनेक ठिकाणी रुजवू अशी घोषणा रविराज काळे यांनी केली आहे.