खा.हेमंत पाटील यांची भेट घेऊन सुनील माने यांनी दिला मराठा आरक्षणाला पाठींबा

पुणे (प्रतिनिधी) : मराठा समाज त्यांच्या न्याय, हक्कासाठी भांडत आहे. मागास राहिलेल्या मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी ज्येष्ठ पत्रकार व कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी आज खासदार हेमंत पाटील यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत आहे. याच मागणीसाठी खासदार श्री. हेमंत पाटील यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी त्यांनी आज आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असलेल्या शिवाजी पुतळ्या समोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. सुनील माने यांनी आज त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

मराठा समाजातील गोरगरीबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. ज्या ज्या व्यक्ती आणि समाज विकासात मागे राहिले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षण दिले पाहिजे. असे मत माने यांनी यावेळी व्यक्त केले. समाजाच्या प्रश्नांसाठी मीही भाजपाचा राजीनामा दिला असल्याचे सांगून त्यांनी हेमंत पाटील यांनीही समाजाच्या प्रश्नांसाठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

See also  शहीद हेमंत करकरे उद्यानातील जागेवर मॅटर्निटी होमचे बांधकाम नको - माजी नगरसेवक योगेश ससाने