मंजुश्री खर्डेकर यांना ओवाळून चंद्रकांतदादा पाटील यांनी पाडला नवीन पायंडा ; दिल्या वाढदिवस व महिला दिनाच्या शुभेच्छा!

कोथरूड :  जागतिक महिला दिन आणि 9 मार्च सौ. मंजुश्री संदीप खर्डेकर यांचा वाढदिवस ह्या निमित्ताने आयोजित केलेल्या आरोग्य चिकित्सा शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.केदार एम्पायर, कर्वे रस्ता येथील शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना ओवाळायला थांबलेल्या भगिनींच्या हातातून ताट घेतले आणि सौ.मंजुश्री खर्डेकर यांना स्वतः ओवाळले व त्यांना वाढदिवसाच्या महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.


पुरुषांनी सर्व ठिकाणी महिलांचा सन्मान करणे व त्यांना समान वागणूक देणे हीच महिला दिनाची खरी भेट असल्याचे प्रतिपादन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कोणत्याही पुरुषाने कुटुंबातच नव्हे तर कुठे ही महिलांना त्रास न देणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. हे सांगतानाच महिलांनीच कां पुरुषांना ओवाळायचे ? पाच पुरुषांनी महिलांना कां ओवाळू नये व त्यांचा सन्मान का करू नये, असेही ना. चंद्रकांतदादा पाटील सांगितले व मंजुश्री खर्डेकर यांना ओवाळले.


तसेच आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहताना वेळोवेळी आरोग्य तपासणी साठी आणखी एक बस उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. तसेच आत्ता उपलब्ध असलेल्या एका बस मध्ये सर्व प्रकारच्या अद्यावत उपकरणे बसविणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थित महिला डॉक्टर्स ना कॅडबरी देऊन त्यांचा देखील सन्मान केला.


यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी,नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले,सुनील पांडे,मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,सुभाष नाणेकर, कल्याणी खर्डेकर,राजेंद्र येडे, निलेश गरुडकर, बाळासाहेब धनवे, वैभव जमदाडे, श्रीकांत गावडे, अपर्णा लोणारे, मंगलताई शिंदे, सुमित दिकोंडा, सतीश कोंडाळकर, राम भिसे, विनायक गायकवाड इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एम एन जी एल च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल राजेशजी पांडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ह्या उपक्रमाचे समन्वयक सुनील पांडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे  संयोजन सुधीर फाटक,अनिकेत मंडाले, हर्षल होजगे, राहुल चौधरी, आकाश जाधव,सचिन पवार, रोहित मंडाले, अभिषेक पवार, अमोल जाधव, रोहित बाबर, सौरभ खंकाळ यांनी केले.

See also  अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर दिनदर्शिका २०२४ ' चे प्रकाशन