माजी नगरसेवक अमोल बालवडकर आयोजित श्रीराम प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्तला मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

बालेवाडी : अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त माजी नगरसेवक अमोल बालवडकर व श्री.अष्टविनायक मित्र मंडळ आयोजीत श्रीराम यज्ञ व राम लल्ला कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण व महाप्रसादाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत पाटील उच्चतंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी भेट देत सर्वांचा आनंद द्विगुणित केला.

संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी आनंदचा दिवाळीचा क्षण असून हा क्षण सर्वांना एकत्रित अनुभवता यावा यासाठी अमोल बालवडकर यांनी सुंदर नियोजन केले. याचा लाभ सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेत प्रभू श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग घेतला. हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण आहे असे आमदार मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील(उच्चतंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, चिटणीस लहू बालवडकर, कोथरूड विधानसभा उत्तर विभाग अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रकाश तात्या बालवडकर, शशिकांत बालवडकर, सुभाष भोळ , राष्ट्रीय स्वंयसेवक संघांचे सदस्य, परिसरातील नागरिक,महिला भगिनी उपस्थित होते.

यावेळी विविध सोसायटीमध्ये बालकांनी श्री राम यांच्यावर आधारित नाट्य सादर केले. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते.

See also  भुगाव भुकूम मधील हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीए चा हातोडा.