रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडे बाजारांवर अतिक्रमण विभागाची कारवाई, रस्त्यावर टाकलेले टेन्ट जप्त ; पुणे बुलेटिनच्या पाठपुराव्याला यश

बाणेर : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडे बाजारांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करत रस्त्यावर टाकण्यात आलेले टेन्ट जप्त करण्यात आले. औंध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ३६ पैकी नऊ आठवडे बाजार अधिकृत असल्याची बातमी पुणे बुलेटिनच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर पादचारी नागरिक व वाहन चालकांच्या मागणीनुसार रस्त्यावरील अनधिकृत आठवडे बाजारांवर पुणे बुलेटिनच्या माध्यमातून पाठपुरावा करून कारवाई संदर्भात बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानुसार  पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने रस्त्यांवर आठवडे बाजार भरू देण्याचा निर्धार करत सातत्याने कारवाई केली जात आहे.

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ममता चौक,दसरा चौक,बालेवाडी हाय स्ट्रीट,औंध आंबेडकर चौक,आय टी आय रोड,गणराज चौक,सुस रोड, मोहन नगर,भाऊ पाटील रोड परिसरातील अनाधिकृत रस्त्यावर भरणाऱ्या आठवडे बाजारांवर कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान १० हाथगाडी,६२ फळ आणि भाजी पथारी,१ व्यावसायिक वाहन,३ फ्रिज,३ काउंटर,३५ इतर साहित्य जप्त करण्यात आले. आय टी आय रोड येथील आठवडे बाजारावर धडक कारवाई करुन २३ कापडी टेंट,५९ टेबल इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.


परिमंडळ क्रमांक २ उपायुक्त सपकाळ, महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या नियत्रणाखाली अतिक्रमण निरीक्षक महेश मारणे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, हणमंत काटकर, अभिलेश कांबळे, मध्यवर्ती पथक तसेच मनपा पोलीस, एमएसएफ, बिगारी सेवक यांच्या पथकाने कारवाई केली.

रस्त्यावर अनधिकृत बाजार भरवणाऱ्यावर यापुढे ही कारवाई करण्यात येईल तसेच असे बाजार भरवू नये असे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण विभागा तर्फे आव्हान करण्यात आले आहे.

See also  बाणेर येथील पार्वतीबाई धनकुडे अध्यापक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न