औंध, बोपोडी येथील ८०० नागरिकांचे पंतप्रधान मोदींना पत्र

बोपोडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक जनकल्याणकारी योजना आणल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औंध , औंध रोड, चिखलवाडी बोपोडी येथील नागरिकांनी आभार मानले आहेत. पंतप्रधानांचे आभार मानणारे ८०० हून अधिक नागरिकांचे पत्र आम्ही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे सुपूर्त केले.

भाजपा शहर सरचिटणीस सुनील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

मोदिजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सातत्त्याने प्रयत्नशील आहोत. याचाच एक भाग म्हणून येथील नागरिकांसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे शिबीर आम्ही आयोजित केले होते. यामध्ये १२०० हून अधिक नागरिकांना ‘आयुष्यमान भारत’ कार्डचे वाटप केले. केंद्र सरकार मार्फत शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याचप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक लस जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच ई -श्रम कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे फॉर्म माझ्या जनसंपर्क कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने भरून देऊन जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी यासाठी प्रयत्न केले. मोदिजींनी केलेल्या या कार्याची पोहचपावती म्हणून औंध, औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथील ८०० हून अधिक नागरिकांनी मोदिजीना धन्यवाद मोदीजी म्हणून पत्र लिहिली आहेत. ती शुक्रवारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे सुपूर्त केली. लवकरच शहरातून एकत्रित रित्या ही पत्रे मा. पंतप्रधानांना पाठवण्यात येतील. यापुढेही भाजपाच्या माध्यमातून आम्ही लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही मी यानिमित्ताने दिली.
या कार्यक्रमाला बुद्धभूषण मंडळाचे अध्यक्ष शिशीकांत भालेराव, सचिव सुभाष जरमल, संकेत कांबळे, अक्षय राठोड, आशिष आडसूळ, जितेंद्र गायकवाड, नित्यानंद, सुनील दैठणकर, संतोष भिसे, अनिल माने, प्रतिक वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  ससून रुग्णालय नक्की कोणासाठी?असा विचारत आप ने सामान्य माणसाला मारहाणीचा व्यक्त केला निषेध