राष्ट्रीय महामार्गावरील मेट्रो स्टेशन क्रमांक दहाचे महाळुंगे ग्रामस्थांनी केले महाळुंगे मेट्रो स्टेशन असे नामकरण

महाळुंगे : माण-हिंजवडी ते शिवाजी महाराजनगर पर्यंत होणार्या मेट्रो स्टेशन नंबर १० ला वारंवार चुकीचा नामउल्लेख होत असलेला अन्याया विरुध्द आवाज उठवत समस्त ग्रामस्थ म्हाळुंगे क्रिडानगरी यांच्या पुढाकाराने स्टेशन ला महाळुंगे मेट्रो स्टेशन असे नामकरण करुन सर्वत्र फलक लावत अनावरण करण्यात आले.

यावेळी शांताराम पाडाळे (पोलीस पाटील) संतोषदादा मोहोळ (जिल्हासंघटक शिवसेना उबाठा) मयुर भांडे (सरपंच म्हाळुंगे) काळुराम गायवाड (मा उपसरपंच) लक्ष्मण पाडाळे (सामाजिक कार्यकर्ते) युवराज कोळेकर (मा उपसरपंच) तुषार हगवणे , रणजित पाडाळे ,पांडुंरग पाडाळे ,ज्ञानेश्वर पाडाळे, रितेश पाडाळे, अभि शेडगे,दत्ता मेटकरी हे यावेळी उपस्थित होते.

मेट्रो स्टेशन नंबर 10 हे महाळुंगे गावाच्या हद्दीमध्ये उभारण्यात आले आहे. या मेट्रो स्टेशनला महाळुंगे मेट्रो स्टेशन असे नामकरण मेट्रो कंपनीने द्यायला हवे होते. ग्रामस्थांच्या भावनांचा आदर ठेवून कंपनीने नावामध्ये तातडीने बदल करावा. तसेच ज्या गावाच्या हद्दीमध्ये स्टेशन आहे त्याच गावाचे नाव स्टेशनला देण्यात यावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

See also  कोथरूड मतदार संघातील "फिरता दवाखाना" यामुळे चंद्रकांत दादा पाटील ठरले कोथरूडचे आरोग्यदूत!