सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या 135 व्या पुण्यतिथी उत्सव निमित्त सद्गुरु जंगली महाराज यांच्या पादुकांची पालखीतून मिरवणुकीचे आयोजन

पुणे : सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या 135 व्या पुण्यतिथी उत्सव निमित्त सद्गुरु जंगली महाराज यांच्या पादुकांची पालखीतून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरु जंगली महाराज भजनी मंडळ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री रोकडोबा मंदिर शिवाजीनगर गावठाण येथून समाधी मंदिर पर्यंत पालखीतून पादूकांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

तसेच शनिवार 12 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता हनुमान जयंतीच्या दिवशी रोकडोबा महाराजांची पालखी रात्री बारा वाजता रोकडोबा मंदिरापासून निघेल. संपूर्ण गावठाणातून मार्गस्थ होणार असून दुसऱ्या दिवशी तीन वाजता रोकडोबा मंदिरामध्ये सांगता होणार आहे अशी माहिती श्री रोकडोबा देवस्थान शिवाजीनगर गावठाण ग्रामदैवत युवराज शिरोळे, सतीश चव्हाण, तानाजी शिरोळे , अविनाश बहिरट यांनी दिली. या उत्सवामध्ये सर्व ग्रामस्थ नागरिक व भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  वसुंधरा अभियान बाणेर संस्थेच्या वतीने कडुलिंबाचे वृक्षारोपण करून गुढीपाडवा साजरा