खारवडे श्री म्हसोबा व श्री भैरवनाथाचा वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुळशी : खारवडे मुळशी तालुका येथे श्री म्हसोबा व श्री भैरवनाथाचा वार्षिक उत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमा दिनांक 12 एप्रिल रोजी होणार आहे. यानिमित्ताने देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवानिमित्त 11 एप्रिल रोजी दीपोत्सव, भजन, भक्ती शक्ती संगम अभंगवाणी व शौर्यगाथा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  तर 12 एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव, श्री मसोबा देवास महरुद्राभिषेक, पुरस्कार वितरण व चांदीचा महिरप अर्पण, अहवाल प्रकाशन तसेच श्री म्हसोबा देवाचा छबिना, पालखी सोहळा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंहभारती महाराज करवीर पीठ, कोल्हापूर, भावार्थ देखणे महाराज पालखी सोहळा प्रमुख आळंदी देवस्थान) व राष्ट्रसंत श्री. भाऊ महाराज परांडे,  शिवाजी महाराज मोरे (विश्वस्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर).  गणेश महाराज कार्ले, डॉ. मानसिंग साबळे (वैद्यकीय अधिकारी, ससून) यांच्या उपस्थितीत  ज्ञानेश्वर बोडके (संस्थापक अभिनव फार्मस क्लब पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच संतोष विठ्ठल भाडळे यांच्या तर्फे श्री म्हसोबा देवास चांदीची महिरप अपर्ण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास विशेष उपस्थिती महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री  प्राजक्ता गायकवाड राहणार आहेत.

सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थ व भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री म्हसोबा भैरवनाथ काळुबाई शंकर देवस्थान ट्रस्ट खारवडेच्या वतीने विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे