खासगी जागेत येऊन बेकायदा ताबा घेत असल्या प्रकरणी पुणे मनपा वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात मधुकर मुसळे यांची पोलीस तक्रार; कारवाईची मागणी

बाणेर : बाणेर येथील रस्त्याचे काम थांबवल्या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी मधुकर मुसळे यांनी देखील बळजबरीने खासगी जागेत येऊन बेकायदा ताबा घेत असल्या प्रकरणी पुणे मनपा वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात पोलीस तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

मधुकर मुसळे म्हणाले, बाणेर सर्वे नंबर 48/1/2/3 या ठिकाणी आमच्या कन्स्ट्रक्शन कंपनीची व्यापारी इमारत असून सदर इमारत बांधताना नियमानुसार आम्ही प्रस्तावित रस्ता रुंदीकरणसाठी जागा नियोजित केली आहे. परंतु त्या ठिकाणी रस्त्या रुंदीकरणाच्या अलाइनमेंटचा वाद असल्याने व आम्ही अनुज्ञेय बांधकाम अद्याप न वापरल्याने महापालिकेकडे जागा हस्तांतरित केली नाही. व सदर पाच गुंठे जागा आमच्या मालकीची ताब्यातील व वयवाटीची आहे व त्याचा सातबारा आमचा नावावर आहे.

सदर जागा रितसर हस्तांतरण त्वरित करून घेणे बाबत तेरा वर्षांपूर्वी महापालिकेकडे सर्व कागदपत्रांची फाईल सादर केली आहे. परंतु त्या फाईलवर अद्याप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही. उलट तेरा वर्षानंतर सदर फाईल हरवल्याची महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.

एक महिन्यापूर्वी उपायुक्त मालमत्ता यांना प्रत्यक्ष भेटून सदर विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. फाइल शोधून तातडीने पूर्तता करण्यास सांगितले परंतु त्या फाईल बाबत पुढे काहीही कारवाई करण्यात आली नाही.

असे असताना पुलाच्या बांधकामाच्या वेळेस अधिकाऱ्यांच्या विनंती वरून व दोन महिन्यात फाईल पूर्तता करून रितसर जागा ताब्यात घेण्याच्या तोंडी आश्वासनावर प्रस्तावित रस्ता रुंदीकरणातील आमच्या जागेतील 70 टक्के जागा पुलाच्या बांधकामासाठी आम्ही वापरू दिली. परंतु त्यानंतर त्या फाईलवर काही काम न करता आता चार वर्षानंतर ती फाईल हरवण्याची माहिती अधिकारी देत आहेत.

असे असताना अचानक दिनांक 30 जून 2023 रोजी साधारणतः दुपारी बारा वाजता बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री उचाले, प्रकल्प विभागाचे श्री वायसे, श्री वायसे यांचे जुनियर व प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता , बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जेसीबी व ट्रक घेऊन जबरदस्तीने आमच्या जागेत घुसले जबरदस्तीने जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी आमच्या इमारतीच्या वॉचमन ने सदर घटना आमच्या कार्यालयात ॲड मधुकर मुसळे यांना कळविली.

See also  राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

त्यानंतर आमच्या कार्यालयाच्या वतीने ॲड मधुकर मुसळे त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांनी सदर वरील नमूद अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे जागेवरून घुसून मालमत्तेचे नुकसान न करण्याबाबत व काम थांबविण्यास सांगितले परंतु सदर अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

आमच्यावर वरिष्ठांचा पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे साहेब व प्रचंड राजकीय दबाव आहे. आम्ही काम नाही केलं तर ते आम्हाला सस्पेंड करतील अशी त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे, त्यामुळे आम्हाला काम करू द्या. जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही नंतर करू , कायदेशीर बाबी नंतर करत बसू परंतु आमच्यावर आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्यामुळे तुम्ही आम्हाला काम करू द्या म्हणून सतत दबाव टाकत होते. नकार दिल्यास वेगवेगळ्या कारणाखाली धमक्या देत होते.

आम्ही तुम्हाला जागेचा ताबा दिलेला नाही तुमच्याकडे काही कागदपत्र असतील तर दाखवा अशी मागणी केल्या असता आमच्याकडे काही कागदपत्र नाहीत परंतु आमच्यावर खूप दबाव आहे आणि वरिष्ठांनी आम्हाला तोंडी आदेश दिलेले आहेत त्यामुळे आमचा नाईलाज आहे. आमच्याकडे लेखी कुठलेही आदेश नाहीत व वरिष्ठांना आम्ही लेखी आदेश मागू शकत नाही आणि ते आम्हाला देत सुद्धा नाहीत परंतु काम नाही केल्यास आजच्या आज सस्पेंड करू अशा धमक्या देत आहेत असे त्यांनी सांगितले.

तुमची फाईल आमच्याकडून हरवली आहे जागा तब्येत घेण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली नाही ही आमची चूक आहे ते आम्हाला मान्य आहे. तरीसुद्धा आमच्यावर राजकीय आणि अधिकाऱ्यांच्या दबाव असल्यामुळे आम्हाला काम करू द्या अशा पुन्हा पुन्हा विनवण्या ते करीत होते. परंतु यापूर्वी सुद्धा दोन महिन्यात फाईल मान्यतेची पूर्तता करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते तेव्हा तुम्ही तुमच्या बाजूने कागदपत्राची पूर्तता केली नसतानी सुद्धा आम्ही तुम्हाला सहकार्य केले व सार्वजनिक हिताचा विषय असल्यामुळे आमच्या जागेतील रस्ता रुंदीकरणातील 70% जागा फुलाच्या बांधकामासाठी वापरू दिली आहे असे मधुकर मुसळे यांनी सांगितले.

See also  शॉटगन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला पहिल्यांदा सुवर्णपदक

त्यावेळी तुम्ही दोन महिन्यात सर्व कागदपत्राचे पूर्तता करून देऊ असे सांगितले. परंतु चार वर्षानंतर सुद्धा हे काम केले नाही व आता ती फाईल गहाळ केल्याचे सांगता त्यामुळे तुमच्या वरिष्ठांकडून रितसर लेखी पत्र/ आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही तुम्हाला काम करू देऊ शकत नाही तोपर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तातडीने खड्डे बुजवून घ्या व एक ते दोन दिवसात जबाबदार वरिष्ठ अधिकार्‍याचे जागा ताब्यात संदर्भातील तेरा वर्ष पेंडिंग फाईल शोधून अथवा दुसरी फाईल तयार करून मान्यता देऊ असे पत्र द्या त्यानंतर तुम्हाला काम करायला आम्ही परवानगी देऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले व त्यांनी ते उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांसमोर मान्य केले.

मध्यंतरी प्रकल्प विभागाचे अधिकारी वायसे यांनी फोनवर अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्याशी बोलायला सांगितले बिनवडे ह्यांनी फोनवर आम्ही तुमच्या जागेचा कुठलाही प्रकारे ताबा घेऊ असे धमकावले व ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.

या सर्व प्रकरणात आम्ही आमच्या मालकीच्या जागेतच उभे होतो पुणे मनपा अधिकारी आमच्या जागेत घुसून काम करण्याचा प्रयत्न करीत होते. हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस , निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व सात ते आठ पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक खताळ यांनी सुद्धा सर्व माहिती ऐकल्यावर जागा मालकाला वरिष्ठांकडून लेखी पत्र देऊन जागेचा ताबा घेण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता आश्वासित करा व मग पुढे काम करा असे सांगितले त्यानुसार पत्र देण्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले त्यानंतर आम्ही सदर जागेवरून पुढे निघून गेलो व पत्रासाठी अधिकाऱ्यांच्या फोन वाट बघत होतो परंतु अधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दांनुसार पत्र दिले नाही उलट रात्री राजकीय व अधिकाऱ्यांच्या दबावाखाली माझ्याविरुद्ध दबाव टाकण्यासाठी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे दुसऱ्या दिवशी मला कळाले. अशाप्रकारे जबरदस्तीने व गुंडगिरी व मोगलाई पद्धतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम करण्याची पद्धत सुरू केली आहे. स्वतःचं अपयश व चुका झाकण्यासाठी अशाप्रकारे नियमबाह्य व बेकादेशीर काम करण्याची नवीन प्रथा पुणे शहरात सुरू झाली आहे लोकप्रतिनिधी बाबत अशा प्रकारचे वर्तणूक होत असेल तर सामान्य नागरिकांची काय स्थिती होत असेल याची कल्पना करू शकत नाही.

See also  नागरीकांनी काळजी घ्यावी; आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सज्ज रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार ; पुणे शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली प्रशासनाकडून माहिती

याबाबत आम्ही हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये महापालिकातील आयुक्त श्री बिनवडे, प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्री वायसे , बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री उचाले, मालमत्ता विभागाचे श्री शिंदे त्याचबरोबर प्रकल्प व बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे या सर्वांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत असे मधुकर मुसळे यांनी सांगितले.