पुणे : मुळा नदीच्या पात्रात हजारो ट्रक राडारोडा टाकून भराव टाकला जात आहे. पिंपळे निलख परिसरात मुळा नदीच्या काठावर हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे नदी सुधार या गोंडस नावाचा वापर करून परिवार नाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस केला जातो आहे. माणसांसाठी कोट्यावधी रुपये जिरवून नदी सुधार होईल ही परंतु या परिसरातील जैव विविधतेचे असे करणार या बाबतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
विकास आणि सुशोभीकरण च्या नावाखाली मुळा नदी काठावर असलेली सोंडमाळ परिसरातील देवराईतील विविध 100 वर्ष जुनी झाडे आता तोडण्यात येतील. बाणेर बालेवाडी स्मार्ट सिटी च्या नावाखाली अगोदरच उध्वस्त करण्यात आली आहे बाणेर बालेवाडी चे सिमेंटचे जंगल करण्यात आले आहे. तसेच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्याची ठिकाणी देखील पालिका, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या नावाखाली उध्वस्त केली जात आहेत.
राम नदी व मुळा नदी काठावरती शेकडो वर्ष जुनी असलेली हजारो झाडे, वेली, गवतं या परिसरामध्ये सिमेंटच्या जंगलातून स्थलांतर झालेल्या लहान प्राणी, पक्षी, कीटक यांचा अधिवास आहेत. नदी सुधार होत असताना यांचा विचार कसा केला जाणार असा प्रश्न पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारची योजना म्हणून नदी सुधार प्रकल्प नदी उध्वस्त होत असताना देखील राबवला जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर तरी हा प्रकल्प थांबवला जाईल असे वाटत होते. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नदी काठ उध्वस्त करून नदीचा एक मोठा कॅनॉल तयार करण्याचा प्रकल्प असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. नागरिकांचा विरोध होत असताना नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग प्रकल्पाला विरोध करत असताना फारसा दिसत नाही. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खासदारांनी या प्रकल्पांबाबत संवेदना व्यक्त कराव्यात तसेच पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या माध्यमातून होत असलेला विरोध केंद्रापर्यंत पोहोचवावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
मुळा नदी काठ उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाचे शिल्पकार कोण? व नदी काठावरील झाडे तोडल्यानंतर या परिसरातील जैवविविधतेच्या भाग असलेल्या लहान प्राणी, पक्षी, कीटक ज्यांचे पुनर्वसन कसे करणार व यांनी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.