बाणेर: बाणेर येथील मुळानदी किनारा व मुळा रामनदी संगमावरील आणि सोंडमळा देवराई वाचवणे आणि नदीपात्रात भराव टाकल्या मुळे निर्माण होणाऱ्या पूर समस्या याबाबत वनविभाग आणि महापालिका तसेच जायका प्रकल्प अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ आणि नदी बचाव व सोंडमळा देवराई बचाव समिती यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आणि श्रीमती सुलोचना अभिमन्यू धनकुडे (वय80 वर्ष) यांनी त्यांच्या तेथील 55 वर्षाच्या प्रत्यक्ष अनुभवावरून सोंडमळा देवराईचे महत्व तेथील धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा या विषयी सर्व अनुभव कथन केले. तसेच विविध प्रकल्पा मुळे होणारे तोटे निदर्शनास आणून दिले व अनावश्यक गोष्टींना तीव्र विरोध केला.
मनपा अधिकाऱ्यांनी देखील सुधारीत आराखडा तयार केलेला आहे त्यात आणखी सुधारणा करून सर्व झाडे, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना बिलकुल हात लावणार नाही, तसेच पिंपळे निलख बाजूला जे चालू आहे तशी कुठलीही कृती आम्ही करणार नाही असे प्राथमिक आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
यावेळी बाणेर बालेवाडी परिसरातील विविध सामाजिक संघटना तसेच पर्यावरण प्रेमी संस्थांचे सदस्य उपस्थित होते.