श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स बँक म्हणून उदयास येईल -शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधिक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे)

कोथरूड :  आजरा सारख्या ग्रामीण भागात उदय आलेल्या श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स संस्थेने अल्पावधीत ५०० कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा पाहिली तर सोपी गोष्ट नाही. त्यामुळे “श्री रवळनाथ” ही संस्था भविष्यात बँक म्हणून उदयास येईल. असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केला.


श्री रवळनाथ को-ऑपरेटिव हाऊसिंग फायनान्स सोसायटी या संस्थेच्या कोथरूड पुणे शाखेचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त   पोलीस अधीक्षक शरीष देशपांडे यांच्या शुभहस्ते श्री रवळनाथ प्रतिमापूजन आणि दीप प्रजनन करण्यात आले त्यावेळी देशपांडे बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर, बांधकाम व्यवसाय प्रवीण बढेकर,  बँकेचे संस्थापक एम.एल. चौगुले, संचालक प्रा. व्हि. के. मायदेव, कोल्हापूर शाखा चेअरमन विजय हरगुडे, पुणे शाखा सल्लागार हेमंत बागडे, सतीश भिडसर, अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे, मोहन विधाते, विशाल माथवड, गणेश माथवड, अंकित काणे, सुनील महाजन,  प्रणवती नाडगोडा, महेंद्र भाई जैन, सुजित यादव, संजय पाटील, कल्याण विधाते, शाखाधिकारी सागर माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सभासद ठेवीदार उपस्थित होते.

राजीव नंदकर म्हणाले, कोणत्याही वित्तीय संस्थेवर लोकांचा विश्वास असेल तरच लोक अशा संस्थेकडे आकर्षित होत असतात. अशा सभासद आणि ग्राहकांचा दृढ विश्वास रवळणाथने संपादित केला आहे. त्यामुळे पुणे सारख्या मोठ्या शहरात अवघ्या दोन वर्षात २३ कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या टप्पा गाठला आहे. प्रवीण बडेकर म्हणाले, गरजू व्यक्तींना सुलभ कर्ज सुविधा देऊन त्यांचे गृह स्वप्न साकारणाऱ्या रवळनाथ चे कार्य कौतुकास्पद असून पुणे शाखा देखील अल्पावधीत १०० कोटी ठेवींचे स्वप्न साकार करेल.
याप्रसंगी पुणे शाखेचे चेअरमन श्री सुहास नाडगौडा यांनी स्वागत व अतिथी परिचय करून दिला. संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र प्रसाद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. श्रीकांत मुसळे यांनी आभार मानले.

See also  मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ