पुणे शहरात भाजपाच्या मंडलाध्यक्षांची नावे जाहीर, मंडलाध्यक्षपदी एकाही महिला नाही; अन्य पक्षातून भाजपात स्थिरावलेल्या पदाधिकाऱ्यांना देखील संधी

पुणे, 20 एप्रिल : शहर भाजप मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सर्व  मंडलांच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. यामध्ये भाजपाने अन्य पक्षातून भाजपामध्ये स्थिर झालेल्या पदाधिकाऱ्यांना देखील मतदार संघाच्या अध्यक्षपदावर संधी दिली आहे. परंतु मतदार संघाच्या अध्यक्ष पदावर शहरात एकही महिला पदाधिकारी घेण्यात आलेला नाही.

हडपसर (४ मंडल), कसबा (३ मंडल), शिवाजीनगर (३ मंडल), कोथरूड (३ मंडल),  वडगावशेरी (४ मंडल),  कॅन्टोन्मेंट  (२ मंडल), पर्वती (३ मंडल) आणि खडकवासला (४ मंडल) अशा विधानसभा निहाय 26 मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा आज करण्यात आली.

निवड झालेल्या अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे
श्री संदीप मोझे – लोहगाव धानोरी, नितीन जाधव- विमान नगर सोमनाथ नगर, आशिष देशमुख – खराडी वडगाव शेरी,  रमेश गव्हाणे -येरवडा, श्री शैलेंद्र बडदे -शिवाजीनगर दक्षिण, आनंद छाजेड – शिवाजीनगर उत्तर, श्री शाम काची – खडकी, लहू बालवडकर, कोथरूड उत्तर (बाणेर बालेवाडी पाषाण), श्री निलेश कोंढाळकर- कोथरूड मध्य, कुलदीप सावळेकर-  कोथरूड (एरंडवणे, कर्वेनगर), राजू कदम – पर्वती – सिंहगड रोड, निखिल शिळीमकर- मार्केट यार्ड, श्री प्रशांत थोपटे – तळजाई, सुशांत निगडे -कोरेगाव पार्क घोरपडी वानवाडी डायस प्लॉट -पुणे कॅनटोणमेंट बोर्ड, विशाल कोंडे ससुन – पुणे स्टेशन – ताडीवाला रोड भवानी रोड -काशीवाडी- सोमवार पेठ मंगळवार पेठ – रास्ता पेठ,अमित कंक -कसबा गणपती, छगन बुलाखे- समता भूमी, प्रशांत सुर्वे -क्रांतिवीर उमाजी नाईक, महेश भोसले- धनकवडी बालाजीनगर, गणेश वर्पे – वारजे – बावधन – भुसारी, यशवंत लायगुडे- वडगाव बुद्रुक – धायरी, रुपेश घुले- धायरी-शिवणे, प्रमोद टिळेकर-कात्रज, सुखसागर नगर, कोंढवा बुद्रुक, अमर गव्हाणे- कोंढवा खुर्द, NIBM, मोहम्मदवाडी, संदीप लोणकर- घोरपडी, मुंढवा, मगरपट्टा, केशव नगर, माळवाडी, साडे सतरा नळी, भोसले गार्डन, आकाश डांगमाळी- वैदुवाडी, रामटेकडी, काळेपडळ, ससाणे नगर हडपसर गाव

See also  औंध येथे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या आमदार निधीतून विकास निधीतून क्रिकेट खेळपट्टी