कोथरूड काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद मार्फत नागरिकांकडून महावितरण संदर्भात आलेल्या तक्रारी समजून घेऊन त्या तक्रारी घेऊन महावितरण कोथरूडचे कार्यकारी अधिकारी अभियंता राजेंद्र काळे यांना निवेदन देण्यात आले. कोथरूडमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोथरूड विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचे राज गोविंद जाधव यांनी दिला आहे.
अनेक वर्षापासुन तक्रार देऊन सुद्धा कोथरूड परिसरातील वीज वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना व व्यापारी वर्गाला नुकसान व त्रास सहन करावा लागत आहे. नियमानुसार वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणाकडून भरपाई साठी नियम उपलब्ध आहे. तरी महावितरण कडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असतो व चौकशी केल्यावर दुरुस्तीचे काम सुरू आहे असे सांगितले जाते व अनेक तास वीजपुरवठा बंद असतो म्हणूनच पावसाळ्याच्या आधी तात्काळ सर्व D.P व इतर लाईनचे काम दुरुस्ती /बदली करावे व नागरिकांना व व्यापारी वर्गाला नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कोथरूड युवक काँग्रेस तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल याबाबत निवेदन देण्यात आले.