औंध परिसरातील विसर्जन घाटांची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून पाहणी

औंध : गणेश उत्सवानिमित्त औंध परिसरातील विसर्जन घाटांच्या स्वच्छतेबाबत शिवाजीनगर चे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पाहणी करून नागरिकांच्या सुविधांसंदर्भात सूचना केल्या.

यावेळी सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सचिन मानवतकर ,आनंद छाजेड, सुप्रीम चोंधे, नितीन बहिरट, वसंत जुनवणे, सौरभ कुंडलिक आदी उपस्थित होते.

यावेळी औंध परिसरातील विविध घाटांवरील स्वच्छता, विसर्जन हौदांची परिस्थिती, विद्युत व्यवस्था तसेच सुरक्षा यंत्रणा याबाबत पाहणी करून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सूचना दिल्या.

प्रशासनाने विसर्जन घाटांवरील व्यवस्थापन नियोजनबद्ध करावे तसेच नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

See also  वारजे वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल