पुणे : चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री.विजयानंद पाटील साहेब यांना भेटून राहुल सोलापूरकर यांने श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या बेताल वक्तव्या बाबत त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशा मागणीचे निवेदन आरपीआयचे नेते संतोष गायकवाड यांच्यावतीने देण्यात आले.
संतोष गायकवाड यांनी चतु:शृंगी पोलीस स्टेशन येथे निवेदन देत कारवाईची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या बाबत सोलापूरकर यांनी बेताल वक्तव्य करत सामाजिक भावना दुखावल्या आहेत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.