कोथरूड मध्ये वाहन चोरीच्या वाढत्या गुन्हानबाबत राष्ट्रवादी युवक कोथरूडचे पोलीस निरीक्षक देशमाने यांना निवेदन

कोथरूड: कोथरूड मध्ये वाहन चोरीच्या वाढत्या गुन्ह्यानबाबत राष्ट्रवादी युवक कोथरूडचे पोलीस निरीक्षक देशमाने यांना निवेदन देण्यात आले. कोथरूड मध्ये सध्या वाहन चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणत घडण्यात येत आहेत. गुजरात कॉलनी, वानाज कॉर्नर, आझाद नगर सारख्या वरदरळीच्या ठिकाणी सोसायटीमधून पार्क केलेल्या टू व्हिलर गाड्या चोरून नेऊन पेट्रोल संपेपर्यंत फिरवतात व पेट्रोल संपल्यानंतर गाडी कोठेही सोडून जातात, त्यामुळे गाडी वेग वेगळ्या ठिकाणी आढळून येते.

गाडी चोरी गेलेली तक्रार कराव्यास व्यक्तींची आपण 24 तास वाट पाहू व त्यानंतर गुन्हा नोंदवू असे पोलीस कडून सांगण्यात येते.व 24 तासानंतर देखिल पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळ टाळ करतात. यादकदाचित गाडी चोरट्यानी त्या गाडीचा वापर करून दुसरा कुठला गुन्हा केला तर गाडी मालकाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेचे वतीने अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी या सर्व प्रकारचे पोलीस निरीक्षक देशामाने साहेब यांना निवेदन दिले आणि वाहन चोरट्यांना पकडून त्यांच्यावरती कडक कारवाही ची मागणी देखील केली.

या वेळी देशमाने साहेब यांनी आठवड्याभरात या चोराचा तपास करून कडक कारवाही करण्यात येईल असे अश्वासन आम्हाला दिले आणि त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी युवकच्या वतीने करण्यात येईल. यावेळी संघटनेचे पदाधिकारी ऋषिकेश शिंदे,  अमित भगत, अमित नवले, रोहन मिसाळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  योगीराज पतसंस्थेला 9 देशांच्या 10 प्रतिनिधींची भेट