पुणे : शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित माजी क्रीडा अधिकारी आणि मार्गदर्शक गुरुवर्य गजानन मारुती पाटील यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त पत्रकार भवन सभागृहात क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. गौरी पाटील यांनी कैलासवासी गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ ‘गुरुवर्य गजानन पाटील क्रीडा प्रतिष्ठान’ची स्थापना केली असून, या अंतर्गत क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रम राबवले जातात. यंदाचा पुरस्कार वितरण समारंभ चौथ्या वर्षात पदार्पण केला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अश्लेष मस्कर, असिस्टंट कमिशनर सीजीएसटी आणि कस्टम, पुणे, तसेच आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू, उपस्थित होते. यावेळी रणजी संघाचे कॅप्टन श्रीकांत जाधव, माजी उपसंचालक जनक टेकाळे, दत्ता झोडगे, अजिंक्य जाधव, मधुकर पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यंदाचा क्रीडा पुरस्कार ॲथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक डॉ. अरविंद चव्हाण, तसेच खेळाडू प्रणव गुरव आणि रुजूला भोसले यांना प्रदान करण्यात आला. तसेच ॲथलेटिक्स क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या सुलक्षणा गवळी, विरेश अंगडी, श्रीशैल खांडेकर, सोमती कोडक, चैतन्य कावरे, दिव्या घोडेकर, गुलाब वसावे, भवनीत कौर, शामराव दौंडकर, दत्ता झोडगे आणि साची पांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विशेष सत्कार ऋतुजा वऱ्हाडे हिचा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात साची पांडे हिच्या प्रार्थनेने झाली, तर समारोप पसायदानाने करण्यात आला. प्रा. डॉ. दिपाली गोडसे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, तर दत्ता झोडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.