बालेवाडी : बालेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम करताना आलेले अपमान, त्रास आणि सरकारी यंत्रणांचा असंवेदनशील चेहरा प्रत्यक्ष अनुभवलेला व्यक्ती म्हणजे सुदर्शन नाशिकराव जगदाळे.
आज तेच अनुभव घेऊन ते प्रभाग क्रमांक ९ – ड मधून आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हणून व्यवस्थेविरोधात थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.सोसायटी अध्यक्ष असताना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे, महापालिकेच्या दारात वर्षानुवर्षे रांगा, नेत्यांकडून बोटावर नाचवले जाणे आणि साधा सेप्टिक टँक साफ करण्यासाठीही खासगी कंपनीतून सुट्टी घेऊन पालिकेच्या उंबरठ्यावर बसावे लागणे – हा सगळा त्रास त्यांनी स्वतः भोगला आहे.
बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असतानाही, पुणे महापालिकेचा कारभार म्हणजे भ्रष्टाचार आणि व्यवस्थापनशून्यतेचा कळस असल्याचे त्यांना प्रत्यक्ष दिसले.
सुदर्शन जगदाळे सांगतात, “माझ्या सोसायटीतील १०० फ्लॅट्सकडून दरवर्षी सुमारे २० लाख रुपये प्रॉपर्टी टॅक्स महापालिकेला जातो. तरीही १० लाख रुपये फक्त पाण्याच्या टँकरवर खर्च करावे लागतात.हा अन्याय नाही तर काय?”
रस्ता, पाणी आणि ड्रेनेज लाइनसारख्या मूलभूत सुविधांसाठी तब्बल तीन वर्षांचा संघर्ष केल्यानंतर त्यांच्या मनात एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला –“हक्काच्या सुविधांसाठी नागरिकांनी लढायचंच का?”याच प्रश्नातून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात २०१९ पासून झाली.आणि अखेर २०२३ मध्ये त्यांनी Persistent Systems मधील उच्चपदाची नोकरी सोडली, कारण“ही सिस्टिम बाहेरून नाही, आतून बदलायची आहे.”
आज त्यांची भूमिका स्पष्ट आहे —कोणत्याही सोसायटी अध्यक्षाला, कमिटीला किंवा सभासदाला असा त्रास होऊ देणार नाही. सर्व सोसायटींना Conveyance Deed मिळालाच पाहिजे. रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज, पथदिवे, पादचारी मार्ग, बागा, स्वच्छता,शिक्षण आणि आरोग्यसेवा या सुविधा संघर्षाने नाही, तर हक्काने मिळाल्या पाहिजेत.
सुदर्शन जगदाळे ठामपणे सांगतात,“ही सत्ता मिळवण्यासाठीची लढाई नाही. ही व्यवस्था बदलण्यासाठीची लढाई आहे.”प्रभाग क्रमांक ९ – ड मध्ये सामान्य नागरिकांचा आवाज बनून, व्यवस्थेविरोधात लढणारा उमेदवार म्हणून सुदर्शन नाशिकराव जगदाळे यांची उमेदवारी सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
























