मराठा आरक्षण आंदोलनास पुण्यात डॉक्टरांचा विशाल “लॉन्ग मार्च “

पुणे : महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पुणे पिंपरी – चिंचवड येथील मराठा समाजातील डॉक्टरांनी एकत्र येऊन कौन्सिल हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान लॉन्ग मार्च मोर्चाचे आयोजन केले होते. त्याठिकाणी साखळी उपोषणास बसलेल्या समाजबांधवांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला.

पुणे शहरातील सर्व पॅथीचे सर्व मराठा डॉक्टर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे, पिंपरी-चिंचवड, हडपसर , दिघी , चंदननगर, खराडी येरवडा, सातारा रस्ता परिसरातील डॉक्टर्स मोठ्या संखेने सहभागी झाले होते. महिला डॉक्टरांचा सहभाग उल्लेखनीय होता.
वैद्यकीय व्यवसायात नेहमी माणुसकी जपत असताना डॉक्टर कधीही जात, पात, वर्ण, भेद याचा विचार न करता उपचार करीत असतात. आरक्षणातील दूजाभाव मराठा समाजातील गुणवंण विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरत आहे. मुले मेरिट मध्ये असून योग्य शिक्षण घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण गरजेचं आहे. आम्ही ते मिळवण्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत.


आजचा मोर्चा यशस्वी होण्यासाठी डॉ संभाजी करांडे – पाटील , डॉ रविंद्रकुमार काटकर तसेच पिंपरी चिंचवडचे डॉ सारिका सावंत आणि हडपसर असोशिएशनचे डॉ चंद्रकांत हरपळे, डॉ शंतनू जगदाळे, डॉ मंगेश वाघ, जिपीए चे डॉ अप्पासाहेब काकडे, डॉ नरेंद्र खेनट, डॉ वायाल, पुणे डॉक्टर असोशिएशनचे डॉ विजय कदम, डॉ सुनील इंगळे, डॉ राज लवंगे, डॉ राजेश माने, डॉ संतोष पवार, डॉ सचिन केदार, डॉ अंबिका गरड, डॉ दिपाली वाघ, डॉ सीमा मांगडे, डॉ शीतल शिंदे, डॉ संगीता खेनट, डॉ उषा मोरे, आदि असंख्य महिला डॉक्टर, दिघी डॉक्टर असोशिएशन पेठ डॉक्टर्स असोसिएशन अश्या नामवंत संघटनेचे एकूण ५०० पेक्षा जास्त डॉक्टर सहभागी झाले होते.

See also  शहरात स्वच्छता अभियान पण पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ड्रेनेज मधील पाणी रस्त्यावर