वैष्णवी हगवणे यांच्या हत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मराठा समाजाचे धनंजय जाधव व अश्विनी खाडे यांनी जाब विचारला; महिला आयोगाने काय कारवाई केली, मीडियासमोर बोला, रुपाली चाकणकर निघून गेल्या

पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कस्पटे कुटुंबांच्या भेटी वेळी विचारला जाब

मयुरी जगताप व अश्विनी कस्पटे या व अश्या इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा. अध्यक्ष या प्रोटोकॉल मधून बाहेर पडा असे धनंजय जाधव, अश्विनी खाडे यांनी चाकणकर यांना सुनावले.

मराठा समाजाचे राजेंद्र कोंढरे , धनंजय जाधव,बाळासाहेब आमराळे ,राकेश गायकवाड, गणेश मापारी, जितेंद्र कोंढरे, उत्तम कामठे, अनिकेत भगत , अतिष शेडगे, राकेश रेपाळे, तानाजी शेवाळे , अनिल बालवडकर, संतोष कराळे , अश्विनी खाडे, हर्षा मोरे, सारिका जगताप, शामल मोहोळ, पुजा  धनंजय जाधव- मोरे श्रुतिका पाडळे, कामिनी मेमाणे, भाग्यश्री बोरकर उपस्थित होते.

यानंतर मराठा समाजाने वैष्णवी हगवणे हत्ये व मराठा लग्न समारंभ विषयावर संबोधन झाले.

See also  पाषाण येथे राष्ट्रीय महामार्गावरील विना परवाना फर्निचर मॉल वर कारवाई