औंध मध्ये कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सौरभ कुंडलिक यांच्या वतीने मोफत छत्र्यांचे वाटप

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण,संसदीय कार्य मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा राज्य सरचिटणीस सौरभ कुंडलिक यांच्या वतीने औंध भागातील नागरिकांना “मोफत छत्री वाटप” करण्यात आले.

यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील,  भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, योगेश बाचल, लहू बालवाडकर, गणेश बागडे, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, वसंतराव जुनवणे, सागर परदेशी, सागर मदने, शशिकांत नाईक, अविनाश लोंढे, आकाश ढोणे, योगेश नाईक, विकास चंद्रा, सुनील शिवतारे, सुजाता पाटील, अनिश अगरवाल,चेतन मुठे उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, समाजासाठी उपयोगी पडतील असे उपक्रम भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी राबवले पाहिजेत. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ यापेक्षा गरजू नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू तसेच तसेच आरोग्य शिबिरे यातून सामाजिक कार्य करणे महत्त्वाचे आहे.

पुणे शहरामध्ये पाच हजारहून अधिक वारकऱ्यांना एकत्रित बोलवून त्यांना वारीमध्ये उपयोगी पडतील अशा वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच 21 जून जागतिक योगा दिनानिमित्त संपूर्ण वारीमध्ये एकाच वेळी लाखो वारकरी योगासने करतील यासाठी १२०० स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी परिसरातील 500 हून अधिक नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

See also  कर्वेनगर गावठाण व अन्य परिसरात मुलांना खेळण्यासाठी मैदानच नाही, कर्वेनगर परिसरात चंद्रकांत मोकाटे पदयात्रेद्वारे प्रचार करताना नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला