सचिन मानवतकर मित्र परिवाराच्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार

औंध : आमदार.सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त औंध प्रभागातील १० वी व १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी एक कौतुकाची थाप म्हणुन गुण-गौरव समारंभ व करीयर मार्गदर्शन शिबीर सचिन मानवतकर मित्र परिवार तर्फे आयोजित करण्यात आला होता.


यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, मनोहर भोळे, पोलीस निरीक्षक चिंतामणी , सचिन मानवतकर,सुनिल पांडे, वरिष्ठ भाजपा सदस्य सचिन वाडेकर, मनोज ठोसर, जुनेद, रितेश घडसिंग, मयुर ताम्हाणे, मयुर भांडे, राम मंडलिक, सचिन मानवतकर मित्र परिवार व प्रभातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी परिसरातील दहावी बारावी विद्यार्थ्यांचा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व दफ्तर देऊन सत्कार करण्यात आला.

See also  परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन