बालेवाडी येथील उमंग ऑटिझम सेंटर अँड सेन्सरी पार्कला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची भेट

बालेवाडी :  औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग व सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांचे संयुक्त प्रकल्प अंतर्गत उमंग ऑटिझम सेंटर अँड सेन्सरी पार्क बालेवाडी याठिकाणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपआयुक्त नितीन उदास, उपआयुक्त अरविंद माळी, मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली.

यावेळी परिमंडळ वैद्यकीय अधिकारी  मा.श्री मुळे, सहाय्यक समाज विकास अधिकारी मा.श्री राजेंद्र मोरे, समाज सेवक अधिकारी मा.श्री संदिप कांबळे, कनिष्ठ अभियंता मा.श्री बडे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मा.श्री भोईर उपस्थित होते.

या सेंटरमध्ये विशेष दिव्यांग नागरिकांसाठी विविध थेरपी असणार आहेत. नागरिकांनी या थेरोपींचा वापर करण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

See also  बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे... मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे