बाणेर येथे सप्तश्रृंग आयुर्वेदीय चिकित्सालयात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

पुणे : सप्तश्रृंग आयुर्वेदीय चिकित्सालय, बाणेर, यांच्या वतीने  एक दिवसीय मोफत आयुर्वेदीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात १५ रुग्णांना औषधोपचार करण्यात आले.शिबिरामध्ये रुग्णांना प्रारंभिक तपासणी, औषधोपचार, पंचकर्म सल्ला, दिनचर्या व ऋतुचर्या मार्गदर्शन, तसेच सुर्णप्राशन माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले.


यावेळी वैद्य .लक्ष्मण लावगनकर, वैद्य.गार्गी लावगनकर, श्री.नितीन मेटकर,सौ.राजश्री मेटकर ,वैद्य.सुप्रिया गोरे,वैद्य.आश्विनी मकरिये,वैद्य.भाग्यश्री जाधव,वैद्य.देवाशीष उंब्रजकर,वैद्य.पद्मश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

See also  कोथरूड परिसरामध्ये सराईत  चोरट्यांकडून लॅपटॉप व तीन दुचाकी हस्तगत