सुतारवाडी लिंक रस्त्यावर साठणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहन चालक त्रस्त

पाषाण : पाषाण येथील सुतारवाडी लिंक रस्त्यावर कै. सुशील निम्हण चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठत  असून याचा पादचारी नागरिक व रस्त्यावरील वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सुतारवाडी पाषाण लिंक रस्त्यावर आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यालयाच्या जवळ मोठ्या प्रमाणात  रस्त्यावर पाणी साठत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून हे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

रस्त्यावर पाणी साठत असल्याने वाहन चालकांना गाड्या चालवताना याचा अंदाज येत नाही. तर रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असून पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु मोठे रस्ते मुख्य पथविभागाकडे तर लहान रस्ते क्षेत्रीय कार्यालयाकडे असल्याने याबाबत अनेकदा दोन्ही विभागांचा समन्वय होत नसल्याने समस्या जैसे थे राहण्याचे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत.

See also  प्राइड इंग्लिश स्कूल मध्ये रामनामाच्या जयघोषात रंगले बालगोपाल!